Ad will apear here
Next
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम
सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय दर वर्षी ‘ऑर्किड ऑरा’ नियतकालिकाची निर्मिती करते. ‘ऑर्किड ऑरा २०१७’ या नियतकालिकाने मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, कन्नड भाषांतून अर्थकारणपर लेख, विज्ञान व अभियांत्रिकी अशा विविध विभागांतून तब्बल २४ प्रथम पारितोषिके, नऊ द्वितीय पारितोषिके व पाच तृतीय अशी वैयक्तिक पारितोषिके पटकाविली आहेत.
 
सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार व प्रमुख अतिथी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिकाचा सन्मान स्वीकारताना  एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधी‘ऑर्किड ऑरा’ सलग दहा वर्षे हे नियतकालिक विद्यापीठाचे पारितोषिक प्रथम किंवा द्वितीय मिळवत आले आहे. या वर्षीच्या नियतकालिकामधून विद्यार्थ्यांनी शब्दांकित केलेल्या सिंधुताई सपकाळ, जयंत नारळीकर, प्रसिद्ध लेखिका सावी शर्मा अशा नामवंतांच्या मुलाखती विविध भाषांमधील ललित लेख, कविता, कथा, वैचारिक लेखन, एकांकिका, व्यक्तीचरित्र, अर्थकारणपर लेख, सामाजिक लेख कला व व्यंगचित्रे अशा विविध प्रकारांतून आपले लेखनकौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळे ‘ऑर्किड ऑरा २०१७’ ही वाचकांसाठी एक पर्वणी ठरली आहे. या नियतकालिकाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

नियतकालिकाचे विद्यार्थी संपादक स्नेहा हारके व आदित्य चव्हाण यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. ‘ऑर्किड ऑरा २०१७’चे संपादक शिवाजी चव्हाण, उपसंपादक प्रा. बसवराज बिराजदार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी नियतकालिकासाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZZLBG
Similar Posts
अभियांत्रिकी पदवी प्रवेश स्वीकृती प्रक्रियेस एक दिवस मुदतवाढ सोलापूर : प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील जागावाटप तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर २८ जून रोजी प्रसिद्ध झाले आहे.  पहिल्या फेरीतील जागांच्या वाटपानुसार विद्यार्थ्यांनी जागा स्वीकारण्यासाठी प्रवेश स्वीकृती केंद्रावर (गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, सोलापूर) जाऊन प्रवेशाबाबतची
‘सोलापूर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी दिला जाईल’ सोलापूर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने आवश्यक निधीही दिला जाईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश नोंदणीसाठी विशेष फेरी सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १९ ते २० जुलैपर्यंत सुविधा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नसेल, अशा विद्यार्थ्यांना आपली नोंदणी नव्याने करण्याची संधी उपलब्ध झाली आहे
शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन सोलापूर : येथील खादिमाने उर्दू फोरम संचलित शहीद कुर्बान हुसेन या शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसन केंद्राचा उद्घाटन सोहळा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. हे केंद्र उर्दू माध्यमाचे आहे. या वेळी बिदरच्या शाहीन शिक्षण समूहाचे सेक्रेटरी डॉ. अब्दुल कदिर अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language